योग दिन
सोमवार, दिनांक 15 जून 2026 रोजी विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली व त्यांना पेन वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.समिता सोमण मॅडम व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. अशाप्रकारे विद्यार्थी प्रवेशोत्सव आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय योग दिन. सोमवार ,दिनांक 22 जून 2026 रोजी म.ए.सो.ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व विद्यालयातील गायक वृंदाने गीत गायन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमास पतंजली योग समितीतर्फे श्री. संदीप काळे सर, श्री. दादा पिलाने, सर श्री महेंद्र मोहिते सर, चांदणी सिंग मॅडम,मीना अग्रवाल मॅडम, अर्चना साहू मॅडम व श्री पंडित रामकेश शर्मा सर इत्यादी योग प्रशिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. यावेळी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. समिता सोमन मॅडम आणि सौ. संजना बाईत मॅडम विद्यार्थी व शिक्षक वृंद ही उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन ,वृक्षासन ,भुजंगासन, वज्रासन व प्राणायाम इत्यादी विविध योगासने व श्वसन क्रियांची प्रात्यक्षिके केली. त्यावेळी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, एकाग्रता वाढते तसेच तणाव कमी होतो याविषयी प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
#school #education#student#teacher #learning #kids #study #schoollife #students #maharashtraeducationsociety #preschool #highschool #children #parents #parenting #kindergarten #classroom #primaryschool #mespune #maharashtraeducationsocietypune#yogday.

🏆
अभिमानास्पद यश! 🏆
राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पनवेल सिटी संघाने उत्कृष्ट कामगिरी करत १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ७ पदके पटकावली आहेत. 🎉🥇🥈🥉
या यशामुळे पनवेल शहराच्या क्रीडा क्षेत्रातील मान आणखी उंचावला आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
भविष्यातही अशाच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहो, हीच शुभेच्छा! 🌟
#PanvelCity #Kickboxing #NationalChampionship #ProudMoment #GoldMedal #SilverMedal #BronzeMedal #SportsAchievement #Panvel
👏 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, नेतृत्वगुणांचा विकास व्हावा तसेच जबाबदारीची भावना
वाढीस लागावी या उद्देशाने म.ए.सो.ज्ञानमंदिर,कळंबोली विद्यालयात मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक उत्साह पूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.
निवडणुकीपूर्वी इयत्ता 8 वी ते 10 वी च्या वर्गांमधील इच्छुक विद्यार्थ्यांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर सर्व उमेदवारांनी वर्गामध्ये जाऊन आपला प्रचार केला विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडले. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ समिता सोमण मॅडम, सर्व शिक्षक व निवडणूक समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मतदान पूर्णपणे गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला.
बुधवार दिनांक 01 जुलै 2026 रोजी मतमोजणी पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आणि सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात आले. सर्व विजयी उमेदवारांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

म.ए.सो. ज्ञानमंदिर,कळंबोली विद्यालयात बुधवार दिनांक 01 जुलै 2026 रोजी शाळा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.समिता सोमण मॅडम व सर्व शिक्षकांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री.संतोष पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विद्यालयाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10 वी मधील विद्यार्थिनींनी केले.
यावेळी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.सविता सोमण मॅडम यांनी शाळेची यशस्वी वाटचाल व गुणवत्तापूर्ण शिक्षण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळा वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यालयात 'गीत गायन स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. 
१ जुलै २०२६ रोजी शाळेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच 'निसर्ग प्रेमी' संस्थेच्या मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेची माहिती देऊन व संस्थापकांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. “एक वृक्ष पर्यावरणासाठी” या संकल्पनेवर आधारित उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, औषधी व सावली देणाऱ्या वृक्षांची रोपे शाळेला भेट दिली.
तसेच 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत 'वटपौर्णिमे' दिवशी वडाच्या झाडाचे रोप आणून त्याचे पूजन करावे व पूजन झाल्यानंतर ते रोप शाळेत आणून जमा करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यासही पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकांनी जमा केलेली झाडे ' निसर्गप्रेमी' संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.
#school #education#student#teacher #learning #kids #study #schoollife #students #maharashtraeducationsociety #preschool #highschool #children #parents #parenting #kindergarten #classroom #primaryschool #mespune #maharashtraeducationsocietypune
नवीन स्वप्नं, नवीन उमेद आणि शिक्षणाच्या सुंदर प्रवासाची आज सुरुवात! 📚✨ #FirstDayOfSchool"
नमस्कार
संस्थेच्या वतीने पुढील काळात येणारे सण-उत्सव व आपल्या परंपरा या पर्यावरणपूरक या थीमवर सर्वत्र साजऱ्या व्हाव्यात अशा प्रकारची योजना केली आहे. या माध्यमातूनच आपण माजी विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळा-महाविद्यालयांशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित व्हावा व ज्यांची अद्याप पर्यंत नोंदणी झाली नसेल, त्यांची नोंदणीही करून घेता यावी, म्हणून आपण अनेक उपक्रम पुढील काळामध्ये आयोजित करणार आहोत. त्यातील पहिला उपक्रम हा पर्यावरणपूरक पंढरीची वारी असा असेल. या उपक्रमाद्वारे आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करावयाचे आहे की आपण पंढरीच्या वारीच्या मार्गावर अथवा ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी एक भारतीय वंशाचे झाड लावावे व त्याचा फोटो वर दिलेल्या फ्लायर्समध्ये दिलेल्या क्यूआर कोड वरती स्कॅन करून पाठवावा. अशा माजी विद्यार्थ्यांना आपण एक सर्टिफिकेट आणि त्यांना नोंदणीसाठी लिंक पाठविणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत हा फ्लायर पोहोचवण्याची व्यवस्था करावी.
पुढील काळात आपणाला पर्यावरणपूरक पंढरीची वारी याचबरोबर पर्यावरणपूरक रक्षाबंधन, पर्यावरण पूरक गणेशोत्सव व पर्यावरणपूरक दिपावली हे सण साजरे करताना विविध उपक्रम राबवायचे आहेत. तरी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की, हा फ्लायर जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करावा.
सर्वांना पंढरीच्या वारीच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद.
माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2026 गुणगौरव सोहळा
शनिवार दिनांक 11/07/26 रोजी म.ए.सो. ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शाला समिती अध्यक्ष मा.श्री. देवदत्त भिशीकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ.समिता सोमण यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 2009-10 बॅचच्या माजी विद्यार्थिनी,महाराष्ट्र राज्य सेवा 2024 मध्ये मागणी पुरवठा अधिकारी पदावर निवड झालेल्या कु. अंकिता कदम ह्या उपस्थित होत्या. अडचणींवर मात करून, जिद्द आणि चिकाटीने, आई-वडिलांची जाणीव ठेवून आपले ध्येय कसे गाठावे याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कु.अंकिता यांनी केले.
प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच शाला समिती अध्यक्ष मा. श्री. देवदत्त भिशीकर सर यांनी भविष्यामध्ये करिअर निवडताना स्किल डेव्हलपमेंट वर भर देऊन वेगवेगळ्या मार्गांचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे मार्गदर्शन केले.
एकूणच हा गुणगौरव सोहळा शाला समिती अध्यक्ष श्री. भिशीकर सर ,महामात्र श्री.झिरमीटे सर आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सौमण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालीअतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी स्वच्छ सुंदर सुरक्षित पर्यावरण पूरक शाळा उपक्रमा अंतर्गत प्लास्टिक मुक्त अभियान महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर कळंबोली या ठिकाणी राबविण्यात आले. प्लास्टिक मुक्त अभियान वर्षभर विद्यालयामध्ये राबविले जाते.ह्या अभियानाअंतर्गत विद्यार्थी आठवडाभर नेमून दिलेल्या जागी घरातील प्लास्टिकच्या मोडक्या वस्तू,बिसलरी बाटल्या तसेच प्लाॅस्टिक पिशव्या घरातील ह्यात ई-कचरा पण जमा केला जातो. ह्यात नादुरूस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू,मोबाईल फोन,head फोन इत्यादी वस्तूंचे विद्यार्थी व शालेय कर्मचारी संकलन करतात. रविवारी दिवसभरात प्लाॅस्टिक निर्मूलन समर्थ भारत व्यासपीठ ठाणे ह्या संस्थेमार्फत प्लाॅस्टिक recycling साठी हा कचरा नेला जातो.
शनिवार दिनांक 11 जुलै रोजी इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. प्लाॅस्टिक मुक्त अभियानासाठी आम्हाला शाळा समिती अध्यक्ष माननीय भिशीकर सर, महामात्र झिरमिटे सर आणि विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ समिता सोमण मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
#school #education#student#teacher #learning #kids #study #schoollife #students #maharashtraeducationsociety #preschool #highschool #children #parents #parenting #kindergarten #classroom #primaryschool #mespune #maharashtraeducationsocietypune
म.ए.सो.ज्ञानमंदिर येथे नाम दिंडीतून हरित भविष्याचा संदेश
शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ रोजी म.ए.सो.ज्ञानमंदिर,कळंबोली माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी टाळ ,मृदुंग,भगवे पताके आणि तुळशीची रोपे घेऊन पारंपारिक वेशभूषेत दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला.' ज्ञानोबा माऊली तुकाराम','पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी'अशा जय घोषांनी परिसर भक्तीमय झाला. दिंडीत माजी विद्यार्थी,पालक,पालक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
दिंडी शाळेच्या परिसरातून निघून कारमेल स्कूल मार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचली. तेथे आरती व पूजा करून श्री. स्वामी समर्थ मठामध्ये आली तेथे पूजा करून विद्यार्थ्यांनी रिंगण केले. काही विद्यार्थिनींनी व महिला शिक्षिकांनी फुगडी खेळ खेळला. यावेळी दिंडीमध्ये 'माजी विद्यार्थी पर्यावरण दिंडी'या संस्थेच्या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. केतन बाणे हे उपस्थित होते त्यांनी वृक्षारोपण केले.तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी चि.यश रासकर, चि.अनुराग मिसाळ, कु.तनिष्का घोरपडे, कु.तेजल पोवार, चि. अभिजीत मिसाळ चि. दुर्वेश पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी दिंडी मार्गावर वृक्षारोपण केले. माजी विद्यार्थिनी कु. अनुष्का काशीद आणि कु. स्नेहल चव्हाण या लेझीम मध्ये सहभागी झाल्या व कु. श्रुतिका डांगे, कु.तन्वी जाधव, चि. दुर्गेश पाटील यांनी देखील दिंडीला आवर्जून भेट दिली. त्यानंतर पुढे दिंडी शाळेत आली. शाळेच्या टेरेसवर आरती करण्यात आली.त्यावेळी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण मॅडम यांनी विठुरायावर आधारित अभंग विद्यार्थ्यांना म्हणून दाखविला. तसेच त्यांनी दिंडीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी परमार्थिक पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली असून विद्यार्थ्यांनी त्यांचे जरूर वाचन करावे असेही विद्यार्थ्यांना आवाहन केले. सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी,पालक,पालक प्रतिनिधी,माजी विद्यार्थी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख झाली तसेच भक्ती, शिस्त, समता, सहकार्य आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
#school #education#student#teacher #learning #kids #study #schoollife #students #maharashtraeducationsociety #preschool #highschool #children #parents #parenting #kindergarten #classroom #primaryschool #mespune #maharashtraeducationsocietypune
फुलांपासून पर्यावरणपूरक स्वच्छता द्रव
म. ए. सो. ज्ञानमंदिर कळंबोली येथे शुक्रवार दिनांक 17- 6 -26 रोजी आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण पूरक अशी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये पालखी सजवण्यासाठी जी फुले वापरण्यात आली त्या फुलांचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक स्वच्छता द्रव तयार करण्याविषयी माहिती व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापराचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देण्यात आली.
पूजा, सण-समारंभ किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांनंतर उरलेली फुले टाकून न देता त्यांचा योग्य वापर करून उपयुक्त स्वच्छता द्रव तयार करता येतो, हे या प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले. हे द्रव बाजारातील द्रवांना पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय आहे. याचा उपयोग फरशी पुसण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, बाथरूम स्वच्छ करण्यासाठी तसेच घरातील इतर स्वच्छतेच्या कामांसाठी करता येतो.
द्रव तयार करण्यासाठी १० वाट्या पाणी, ६ वाट्या फुलांच्या पाकळ्या आणि १ वाटी गुळाची पावडर एकत्र करून मिश्रण तयार केले जाते. तयार केलेले मिश्रण साधारण तीन महिने ठेवले जाते. सुरुवातीच्या दहा दिवसांत दररोज बाटलीचे झाकण थोडेसे सैल करून पुन्हा घट्ट बंद करावे. तसेच पुढच्या वेळी नवीन लिक्विड तयार करताना पहिल्या तयार झालेल्या लिक्विडचा थोडासा अंश नवीन मिश्रणात मिसळल्यास प्रक्रिया अधिक वेगाने होते व द्रव लवकर तयार होतो.
"टाकाऊपासून टिकाऊ" हा संदेश देणारा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल
या उपक्रमाची संपूर्ण माहिती सौ. अपर्णा थळे मॅडम आणि सुनीता थोरात मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रात्यक्षिके करून दाखविली .
कार्यक्रम : W.Y.S.A. अंतर्गत मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण मार्गदर्शन सत्र मंगळवार
दि.21/07/2026 म ए सो ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालयात W.Y.S.A. (Women's/Youth Support & Awareness) अंतर्गत मुलींच्या शिक्षण, आत्मविश्वास वाढ, वैयक्तिक विकास व भविष्यातील संधी याविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात संस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्वास, ध्येय निश्चिती, अडचणींवर मात करण्याची तयारी आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश देण्यात आला.
सत्रादरम्यान विद्यार्थिनींना माहितीपर पुस्तिका वितरित करण्यात आली. या पुस्तिकेमध्ये शिक्षणाचे महत्त्व, अभ्यासातील सातत्य, पालकांची भूमिका, तसेच शंका निरसनासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक व QR कोडची माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला. संवादात्मक पद्धतीमुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि पुढे जाऊन स्वतःचे ध्येय गाठण्याची प्रेरणा निर्माण झाली.
हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी W.Y.S.A. संस्थेच्या प्रतिनिधींचे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
आज बुधवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञान मंदिर कळंबोली.विदयालयात माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने "व्यसनमुक्ती आणि सायबर सुरक्षा (सायबर कॅफे वापर) मार्गदर्शन" या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कळंबोली सायबर क्राईम शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.अमोल चौगुले सर, व सहायक अधिकारी मा.कैलास म्हात्रे सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमापूजन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, तंबाखू, गुटखा, मद्य, अंमली पदार्थ तसेच मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना सायबर कॅफे आणि इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सायबर फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि ऑनलाइन गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले.मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याची, निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची तसेच डिजिटल माध्यमांचा सुयोग्य व सुरक्षित वापर करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची आणि सायबर गुन्हे थांबून आपण व आपला परिवार कसे सुरक्षित राहू यासंदर्भात महाराष्ट्र सायबर शाखेकडून मदत क्रमांक सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ समिता सोमण सर्व शिक्षक व विदयार्थ्याचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.म्हात्रे सर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ शिक्षक श्री.पाटील सर उपस्थित होते.
हा मार्गदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.
म ए सो ज्ञानमंदिर कळंबोली.
प्राथमिक विभाग
आषाढी एकादशी
शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांचे रिंगण साकारून विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेतील शिंदे काका यांनी पुढाकार घेऊन रिंगणाची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली होती.
यानंतर आषाढी एकादशीचे दिनविशेष, त्याचे महत्त्व, भक्तिगीते, आरती आणि विठ्ठल नामस्मरण यांमुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिमय झाले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जाणीव यांची सुंदर जोपासना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
#school #education#student#teacher #learning #kids #study #schoollife #students #maharashtraeducationsociety #preschool #highschool #children #parents #parenting #kindergarten #classroom #primaryschool #mespune #maharashtraeducationsocietypune
गुरु हे ज्ञान, संस्कार आणि जीवनाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञान मंदिर कळंबोली विद्यालयात मंगळवार २८\७\२०२६ रोजी गुरुपूजन व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गुरु व्यासाच्या प्रतिमापूजनाने झाली.
यानंतर मान्यवर कीर्तनकार ,सौ.वर्षा रानडे सहस्त्रबुद्धे यांनी गुरुंचे जीवनातील महत्त्व, संतपरंपरा, भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य नाते, तसेच नैतिक मूल्ये यांवर प्रभावी कीर्तन सादर केले. रूपकात्मक उदाहरण देऊन कथेचा सार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला.त्यांच्या सरळ आणि ओघवत्या वाणीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापिका आणि उपस्थित मंत्रमुग्ध झाले.कीर्तनाला तबला साथ श्री.गणेश घाणेकर व पेटी साथ श्री.चंद्रकांत मने यांनी दिली. कीर्तनातून विद्यार्थ्यांना आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे थळे मॅडम यांनी आभार मानले. सर्वांनी गुरुपौर्णिमेचा हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल म.ए.सो. ज्ञानमंदिर कळंबोली मा.मुख्याध्यापिका. समिता सोमण यांनी समाधान व्यक्त केले. गुरूमाऊली सौ.वर्षाजीचे आणि गुरूभगिनी यांचे आभार व्यक्त केले. हा कीर्तन सोहळा विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करणारा आणि गुरूविषयी आदरभाव दृढ करणारा ठरला.
गुरुपौर्णिमा
म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली
आज बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन, ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिनविशेषपर महत्त्व सांगण्यात आले. स्पर्धेसाठी इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांनी करुणाष्टके, ६ वीच्या विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा या श्लोकांचे सादरीकरण केले.
स्पर्धेचे परीक्षण सौ.प्रियंका फडके मॅडम यांनी केले. त्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक २९ जुलै रोजी इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प. कु .सामवेद सचिन केलटकर (वय वर्ष १७) तसेच मुख्याध्यापिका सौ संजना बाईत मॅडम, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व गुरु वंदनेने करण्यात आली.
प्रमुख वक्त्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरुचे स्थान, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, विद्यार्थ्यांनी जोपासावयाचे आदर्श गुण, शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि संस्कार यांविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा, नियमित अभ्यास करावा आणि चांगले नागरिक बनण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा मौल्यवान संदेश त्यांनी दिला.
शिक्षकांनीही दिनविशेष पर महत्त्वातून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदरभाव, कृतज्ञता आणि नैतिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ व्हावी या उद्दिष्टाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, संस्कारक्षम आणि ज्ञानवर्धक ठरला.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक २९ जुलै रोजी इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प. कु .सामवेद सचिन केलटकर (वय वर्ष १७) तसेच मुख्याध्यापिका सौ संजना बाईत मॅडम, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व गुरु वंदनेने करण्यात आली.
प्रमुख वक्त्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरुचे स्थान, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, विद्यार्थ्यांनी जोपासावयाचे आदर्श गुण, शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि संस्कार यांविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा, नियमित अभ्यास करावा आणि चांगले नागरिक बनण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा मौल्यवान संदेश त्यांनी दिला.
शिक्षकांनीही दिनविशेष पर महत्त्वातून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदरभाव, कृतज्ञता आणि नैतिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ या उद्दिष्टाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, संस्कारक्षम आणि ज्ञानवर्धक ठरला.

म. ए . सो. ज्ञान मंदिर, कळंबोली. आमच्या पूर्व प्राथमिक विभागात बुधवार दिनांक 2९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व व एकलव्याची छोटीशी गोष्ट सांगितली
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना गुरु हा ज्ञानाचा दीपक असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. हा मौल्यवान संदेश सुद्धा या कार्यक्रमातून देण्यात आला. नंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
आपल्या
शाळेची विद्यार्थिनी कु. स्वरा विनोद काळेल (इयत्ता ४ थी) हिने जिल्हास्तरीय ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये "सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा मानाचा किताब मिळवून शाळेचा आणि पालकांचा अभिमान वाढवला आहे. 🥋🥇
स्वराचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 💐
#ProudMoment #KarateChampion #BestPlayer #StudentAchievement #SchoolPride #CongratulationsSwara
व्यक्तिमत्त्व विकास केंद्रातर्फे शिक्षकांसाठी व्याख्यान
दिनांक : ३१ जुलै २०२६ (शुक्रवार)
स्थळ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर, कळंबोली
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर, कळंबोली येथे दिनांक ३१ जुलै २०२६, शुक्रवार रोजी व्यक्तिमत्त्व विकास केंद्रातर्फे सर्व शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचा मुख्य विषय "शिक्षक–विद्यार्थी सुसंवाद व प्रभावी अध्यापन" हा होता.
सौ.गिरिजा लिखिते यांनी व्याख्यानात शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांशी सुसंवादाचे महत्त्व, प्रेमळ व सकारात्मक अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्याचे उपाय तसेच शिक्षकांच्या वागणुकीचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा प्रभाव याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी "Teachers who love teaching, teach children to love learning" हा प्रेरणादायी विचारही अधोरेखित करण्यात आला.
सर्व शिक्षकांनी व्याख्यानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. व्याख्यानातील मार्गदर्शनामुळे अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी, विद्यार्थ्यांशी सकारात्मक नाते निर्माण करण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अशा अनेक बाबींची माहिती मिळाली. उपस्थित शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा व्याख्यानांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी स्वच्छ सुंदर सुरक्षित पर्यावरण पूरक शाळा उपक्रमा अंतर्गत "प्लास्टिक मुक्त अभियान" म.ए.सो.चे ज्ञानमंदिर,कळंबोली या ठिकाणी राबविण्यात आले. प्लास्टिक मुक्त अभियान वर्षभर विद्यालयामध्ये राबविले जाते.ह्या अभियानाअंतर्गत विद्यार्थी आठवडाभर नेमून दिलेल्या जागी घरातील प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू, प्लास्टिक बाटल्या तसेच प्लाॅस्टिक पिशव्या, ह्यात ई-कचरा पण जमा केला जातो. ह्यात नादुरूस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू,मोबाईल फोन,head फोन इत्यादी वस्तूंचे विद्यार्थी व शालेय कर्मचारी संकलन करतात. रविवारी दिवसभरात प्लाॅस्टिक निर्मूलन समर्थ भारत व्यासपीठ ठाणे ह्या संस्थेमार्फत प्लाॅस्टिक recycling साठी हा कचरा नेला जातो.
शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ऑगस्ट महिन्यामध्ये माध्यमिक विभागात एकूण 21 किलो प्लास्टिक कचरा आणि 4.9 किलो ई कचरा संकलित करण्यात आला.
प्लाॅस्टिक मुक्त अभियानासाठी आम्हाला शाला समिती अध्यक्ष मा.श्री. भिशीकर सर, महामात्र श्री. झिरमिटे सर आणि विद्यालयाच्या मा. मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने नशामुक्त अभियानाचे आयोजन म.ए.सो.ज्ञानमंदिर कळंबोली.विदयालयात शनिवार दिनांक.८/८/२०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांकडून सरस्वती प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वरिष्ठ शिक्षिका श्रीमती थोरात मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
आजच्या काळात व्यसनाधीनता ही समाजापुढील गंभीर समस्या आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच इतर व्यसनांपासून दूर राहून निरोगी व आनंदी जीवन जगणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने “नशामुक्त जीवन – सुखी जीवन” या संदेशासह नशामुक्ती अभियान संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. या अभियानातून भारत सरकार बरोबर केलेल्या करारानुसार संस्थेच्या सदस्यांकडून व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि सकारात्मक जीवनशैली याबाबत मौल्यवान मार्गदर्शन विद्यार्थांना करण्यात आले.नशामुक्त होण्यासाठी आपण पाच चांगल्या सवयी अंगीकारणे किती महत्त्वपूर्ण आहे. हे सांगताना त्यांनी ध्यान साधनेतून मनाची एकाग्रता व परमात्म्याचे आभार कसे मानावे ह्यासाठी संकल्प कसा करावा. हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती वाघ मॅडम यांनी केले.वाघ मॅडम यांच्या कडून विदयार्थ्याना व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवन जगण्यासाठी या अभियानात आपण सहकार्य करूया असे आवाहन करण्यात आले. वाघ मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे,मुख्याध्यापिका, शिक्षक, व विदयार्थ्याचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी व ज्ञानवर्धक करण्यासाठी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती.समिता सोमण यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाची सांगता नशामुक्त भारत प्रतिज्ञा करून झाली.
म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली.
पर्यावरणपूरक राखी उपक्रमांतर्गत
व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
विद्यार्थ्यांमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्याच्या पद्धती, विक्री कौशल्य,प्रभावी सादरीकरण, उद्योजकता, स्वावलंबन व आत्मविश्वास निर्माण करणे, उत्पादन निर्मिती, वस्तूंचे पॅकिंग, किंमत ठरविणे, विक्री कौशल्य, ग्राहकांशी संवाद, व्यवहार कौशल्य आणि नफा-तोट्याचे प्राथमिक ज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक सौ. स्वप्ना चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या ' जयू राणी क्रिएशन' या नावाने हस्तकला व्यवसायात गेली 12 वर्षे कार्यरत आहेत. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन प्रशिक्षकांनी केले.



























