महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली
कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत
म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली, नवी मुंबई
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे संगोपन करतांना समाजातील सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना ‘सन १८६० मध्ये झाली. भारतातील जबाबदार देशभक्तीपर नागरिक बनविण्यासाठी सातत्याने १५९ वर्ष कार्यरत असणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था. या संस्थेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ७७ शाखांमध्येच कळंबोली येथील म.ए.सो. ज्ञानमंदिर या शाळेचा समावेश होतो.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बद्दल
शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.