

स्वच्छता की ओर एक कदम
स्वच्छ, सुरक्षित पर्यावरणपूरक शाळा या अंतर्गत पनवेल महानगरपालिका स्वच्छता समितीचे दि. १४/१०/२०२२ रोजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या करिता व्याख्यान आयोजित केले गेले. पनवेल महानगरपालिका स्वच्छता समितीचे अधिकारी श्री. अरुण कांबळे व त्यांचे सहकारी यांच्या मार्फत विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले गेले. ओला कचरा व सुका कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर, ओला कचरा विघटनशील असून त्याचे खत बनवणे याविषयी माहिती देण्यात आली. ओला कचरा हिरव्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्यात व सुका कचरा निळ्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्यात गोळा करावा हे सांगून विद्यार्थी व शिक्षकांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली.
‘स्वच्छता के दो रंग हरा गिला सुका निला’ हे घोषवाक्य विद्यार्थ्याकडून म्हणून घेतले.
