भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयातील आवश्यक त्या उपकरणांनी , साहित्यांनी सुसज्य अशी प्रयोगशाळा आहे. इ. ५ वी. ते १० वी. विज्ञान विषयावर आधारित प्रयोग प्रत्यक्ष विद्यार्थी प्रयोगशाळेत करतात. आठवड्याच्या वेळापत्रकात २ तासिका प्रयोगाला दिल्या जातात.
दरवर्षी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येते. यातील विज्ञानावर आधारीत प्रकल्प , प्रतिकृती बनविताना प्रयोगशाळेचा खूप उपयोग होतो. प्रयोगशाळेतील साहित्याचा उपयोग करून छोटे – छोटे प्रयोग वर्गात दाखविले जातात.
ग्रंथालय म्हणजे पुस्तकांचे एकिकरण. एका जागी वेगवेगळी विषयांवरील पुस्तके ठेवण्याचे ठिकाण. येथे ग्रंथ या शब्दाचा अर्थ केवळ पुस्तक एवढाच नसून वाचन साहित्य किंवा विविध माहिती मिळण्याचे माध्यम असाही होऊ शकतो. शिक्षण व्यवस्थेत वाचनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक या साऱ्या घटकांनी सतत वाचन केल्याशिवाय ज्ञानार्जन होऊ शकत नाही. शालेय ग्रंथालय समृद्ध असणं हे शाळेने अभिमानाने मिरवता यावं असं भूषण आहे. म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेतील आमचे ग्रंथालय असेच विविध विषयावरील पुस्तकांनी समृद्ध आहे. ग्रंथालयात शाळा स्थापना वेळेस एकूण २०० पुस्तके होती. आज ग्रंथालयात ५००० ग्रंथसंख्या उपलब्ध आहे.
या पुस्तकांचा वापर इ. १ ली. ते १० वी. चे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक करतात. इ. ५ वी. ते १० वीच्या विद्यार्थ्यांना घरी वाचण्यासाठी पुस्तके दिली जातात. इ. ५ वी. ते १० वीच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय तासिका दिली आहे. त्या तासिकेला येऊन विद्यार्थी ग्रंथ देवघेव करतात.
शाळेची ग्रंथालये खऱ्या अर्थाने अद्ययावत आणि समृद्ध झाली तरच उदयाची भावी पिढी ज्ञानाने परिपूर्ण होणार आहे. शिवाय शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
शाळेला 70 मी. x 50 मी. लांबीचे मैदान लाभले आहे.
मैदानात नियमित कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, लगोरी, लंगडी , डॉजबॉल अॅथलॅटीक्स अशा प्रकारचे खेळ घेतले जातात.
नियमित संध्याकाळी 6.30 ते 8.00 वा.पर्यंत क्रीडावर्धिनी अंतर्गत विविध व्यायाम प्रकार, खेळाचा सराव घेतला जातो. क्रीडावर्धिनीसाठी नियमित 40 – 50 विद्यार्थी सहभागी असतात. माजी विद्यार्थी जे राज्यस्तरीय खेळाडू आहेत त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना विनाशुल्क मिळते.
आजपर्यंत विविध खेळात शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धांमध्ये खेळले आहेत. असोसिएशनमार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा मध्ये आपले विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत खेळले आहेत.
तायक्वांडो, कराटे, कुस्ती, कॅरम, बुद्धीबळ अशा विविध वैयक्तिक स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन विभागापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
दरवर्षी 150 ते 200 विद्यार्थ्यांचा विविध खेळामध्ये , स्पर्धामध्ये सहभाग असतो.
- ज्ञानवर्धिनी परीक्षा – इयत्ता ४थी, ६वी व ७वी
- इंग्रजी मॅरेथॉन स्पर्धा
- डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा
- संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान
- शिष्यवृत्ती परीक्षा – इयत्ता ५ वी व ८ वी.
- गणित संबोध परीक्षा – इयत्ता ५ वी व ८ वी.
- एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा
- इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा
- अखिल भारतीय महात्मा गांधी राष्ट्रभाषा विकास परिषदेतर्फे हिंदी स्पर्धा परीक्षा.
- रंगोस्तव सेलिब्रेशन मुंबई तर्फे रंगभरण . कोलाजकाम , हस्ताक्षर , कार्टून मेकिंग स्पर्धा.
- आंतरशालेय क्रीडा स्पर्धा - क्रीडा करंडक ( लंगडी, डॉजबॉल, खो – खो )
म.ए.सो.ज्ञानमंदिर विद्यालयात जून 2013 पासून इ. 9 वी व 10वी साठी R.S.P.पथक सुरु करण्यात आले.
सन . 2014 ला झालेल्या ‘वाहतुकसुरक्षा सप्ताहात’ विद्यालयातील R.S.P.पथकाला नवी मुंबई विभागातून ‘प्रथम’ परितोषिक मा. सचिन पिळगावकर व मा.शंकर महादेवन आणि नवी मुंबईचे पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आपल्या विद्यालयातील R.S.P.पथक दरवर्षी पोलीस मुख्यालयात होणाऱ्या आर एस.पी कॅम्पमध्ये सहभागी होते. पथका मार्फत दरवर्षी स्वच्छता अभियान, प्रथमोपचार, क्षेत्रभेट, ट्रॅफीक पी.टी.नागरी संरक्षण व रस्ता सुरक्षा असे विविध उपक्रम राबविले जातात. आर.एस.पी. पथकामध्ये इ. 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
आर.एस. पी.पथक सुरु करण्याची उद्दिष्टे :-
१) नागरी संरक्षणाची जाणीव करून देणे.
२) वाहतुक सुरक्षा व त्याचे महत्त्व पटवून देणे.
३) प्रथमोपचाराचे महत्त्व जाणून घेणे.
४) नैसर्गिक आपत्ती बचाव कार्याची माहिती करून देणे.
पथकाचे मार्गदर्शक
१) सौ.अपर्णा सुनिल थळे.