शालेय उपक्रम २०२५ - २६
आंतरराष्ट्रीय योग दिन
दिनांक 21 जून 2025 रोजी म. ए.सो. ज्ञानमंदिर , कळंबोली विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. घाडगे मॅडम उपस्थित होत्या. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. दिपाली कुलकर्णी मॅडम व सर्व प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. सौ कुलकर्णी मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या आचार्या सौ. घाडगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी पद्मासन, प्राणायाम, योगासन व सूर्यनमस्कार असे विविध व्यायामाचे प्रकार घेतले. विद्यार्थ्यांना योगाचे व व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. जीवनामधील योग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. शेवटी विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.अपर्णा थळे मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
आंतरराष्ट्रीय योग दिन
जागतिक योग दिनानिमित्त योगसत्र *
शै.वर्ष 2025 - 26
"करो योग रहो निरोग" या उक्तीनुसार योगाभ्यास करणे म्हणजे शरीर व मन यांचा संयोग करणे.
आपल्या व्यक्तिमत्त्वाचे शारीरिक, मानसिक ,भावनिक ,अध्यात्मिक , सामाजिक असे विविध पैलू असतात. या सर्व पैलूंमध्ये संतुलन प्राप्त करण्यासाठी "योगाभ्यास" महत्त्वपूर्ण ठरतो. याचेच महत्त्व जाणून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी म.ए.सो ज्ञानमंदिर विद्यालयात पतंजली योग समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या योग सत्रासाठी एकूण चार प्रशिक्षक विद्यालयात उपस्थित होते. त्यांनी योगाचे मार्गदर्शन करत विविध प्रात्यक्षिके व आसने विद्यार्थ्यांकडून करून घेतली. इयत्ता 5 वी ते 7 वी च्या एकूण 420 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन सुंदर योग प्रात्यक्षिके यावेळी केली. श्री.महेंद्र मोहिते, पतंजलीचे श्री रामदेव बाबा यांचे शिष्य श्री संजय यादव, श्रीमती चांदणी सिंग, श्री शिवदासन योगा शिक्षक म्हणून उपस्थित होते.या योगसत्रातून विद्यार्थ्यांना विविध आसनांमधून मानसिक व शारीरिक संतुलन राखले जाते हे समजले. त्याचबरोबर योगाभ्यासातून स्व अनुशासन साधले जाते हेही विद्यार्थ्यांनी जाणले. योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात हा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला.
म. ए. सो .ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
1 जुलै शाळेचा वर्धापन दिन यानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारत विकास परिषदेचे सहसचिव श्री.नितीन कानिटकर मुंबई कोकण प्रांत ) भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री.सुबोध भिडे उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संस्थापक श्री. वामन प्रभाकर भावे, श्री. वासुदेव बळवंत फडके, श्री लक्ष्मण नरहर इंदापूरकर व सरस्वती माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. म. ए. सो. गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळा माझ्या भेटीला या आत्मकथनाचे सादरीकरण झाले.इयत्ता 1 ली ते 4 थीच्या वर्गांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इ 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
*शाळा वर्धापन दिन *
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञानमंदिर,कळंबोली विद्यालयात दिनांक 1जुलै 2025 रोजी शाला वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यालयात गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री गवळे सर उपस्थित होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भावगीते, भक्ती गीते अशी विविध गीते सादर केली. विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री गवळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण जीवनामध्ये कधीही हार न मानण्याचा व आपली स्वप्ने नेहमी मोठी ठेवण्याचा विचार दिला. गीत गायन स्पर्धेचे परीक्षण श्रीमती थोरात मॅडम यांनी केले. संपूर्ण वातावरण हे मंत्रमुग्ध होऊन गेले होते. शेवटी विद्यालयाचे शिक्षक श्री. खताळ सर यांनी आभार प्रदर्शन केले. अशाप्रकारे शाला वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार पडला.
* वर्ग प्रतिनिधी निवडणूक*
दिनांक 05 जुलै 2025 रोजी म. ए .सो.ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी वर्ग प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीसाठी प्रत्येक वर्गातून तीन मुली व तीन मुले असे एकूण सहा उमेदवार एका वर्गातून उभे राहिले होते. ही निवडणूक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ई.व्ही.एम. मशीनद्वारे घेण्यात आली. यावेळी विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री. गवळे सर यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. अतिशय स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पडली.
गुरुपौर्णिमा
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त नाट्यीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांचे सूत्रसंचलन सौ. अर्चना हांडे यांनी केले. सौ. अलका बिऱ्हाडे यांनी दिनविशेष पर महत्व सांगितले. इयत्ता 1ली व 2 रीच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांवर आधारित गोष्टींचे कथन केले.इयत्ता 3 री व 4 थीच्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरणातून गुरुशिष्य परंपरेचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना सौ सुरभी संतोष जाधव यांनी प्रवचनातून विद्यार्थी दशेतील आपली कर्तव्य व गुरूंचे आपल्या आयुष्यातील महत्त्व विशद केले.
वृक्ष संवर्धन दिन
म ए सो ज्ञानमंदिर,कळंबोली. (प्राथमिक)
आज बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी वृक्ष संवर्धन दिन म.ए.सो ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त पालकांच्या सहकार्याने हँगिंग कुंड्या, ऑक्सिजन पार्क तसेच फुलझाडे व इतर विविध प्रकारच्या झाडांची खरेदी करण्यात आली व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दीपपूजन
आज दिनांक 24/7/2025 गुरुवार आपल्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये पारंपारिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने दीपपूजन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मातीचे सुंदर दिवे तयार केले होते. शिक्षकांनी दीप पूजनाच्या धार्मिक आणि सामाजिक महत्त्वावर माहिती सांगितली.
संस्कृत दिवस दिनांक 07/08/2025
म .ए .सो. ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात दिनांक ०७/०८/२०२५ रोजी संस्कृत दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री. गवळे सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतून विविध विषयांवर आधारित नाटके व नृत्य सादर केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून मोबाईलचे दुष्परिणाम व संस्कृत भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी
म. ए .सो चे ज्ञानमंदिर कळंबोली या विद्यालयात आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध मराठी शासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक गवळे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला याच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. कुलकर्णी मॅडम व श्रीमती थोरात मॅडम यांची उपस्थिती लाभली होती. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांची हितगुज साधताना माननीय मुख्याध्यापकांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इंदूर संस्थानाच्या राणी होत्या. आपल्या कार्यामुळे त्यांनी एक आदर्श शासक म्हणून ओळख मिळवली, त्याचबरोबर अनेक मंदिरे ,अनेक धर्मशाळा त्यांनी बांधल्या आणि अनेक तीर्थक्षेत्रांचा त्यांनी विकास घडवून आणला. या चित्रकला स्पर्धेत एकूण 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अनेक विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आकर्षक आणि मार्मिक चित्र काढले. या सर्व चित्रांचे परीक्षण चित्रकला विषयाच्या शिक्षिका सौ चित्रा तायडे मॅडम यांनी केले.
स्वातंत्र्य दिन ( 15 ऑगस्ट 2025 )
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या म.ए.सो. ज्ञानमंदिर व पब्लिक स्कूल कळंबोली विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.राजाराम फडतरे (माजी सैनिक) लाभले. तसेच ध्वजारोहण करण्याचा मान एस.एस.सी. परीक्षेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कु.स्नेहल सतीश काशीद हिचे पालक श्री. सतीश वसंत काशीद व सौ. ज्योती सतीश काशीद यांना मिळाला. तसेच पब्लिक स्कूल मधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु.आयुषी पात्रा हिचे पालक सौ सुदेशना पात्रा यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
१५ ऑक्टोंबर (वाचन प्रेरणा दिन )
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती
स्वातंत्र्य भारताच्या वाटचालीत भारताला अनेक राष्ट्रपती मिळाले. त्यापैकी तरुणांच्या मनावर सर्वाधिक प्रभाव करणारे राष्ट्रपती म्हणून उल्लेख केला जातो. तो माझी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम यांचा. डॉ. कलामांनी भारताला २०२० च्या बलशाली भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा उक्ती, कृतीतून मार्ग ही दाखविला त्यातूनच प्रज्वलित मने, अग्निपंख प्रत्यक्षात उतरवले. तरुणांच्या ओठावर देशभक्तीची, देश प्रेमाची गीते उमलू लागली. या उमलत्या गीतांना साकार रूप देण्यासाठी डॉ. कलामांनी विद्यार्थी, युवक, शिक्षक यात्रही वर विशेष भर दिला. अशा या थोर शास्त्रज्ञ व साहित्यिकाचा जन्म दिवस म. ए. सो. ज्ञानमंदिर शाळेत डॉक्टर कलामांच्या प्रतिमेचे पूजन प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चंदू गवळे, सुधागड शाळेच्या माझी शिक्षिका सौ. मोहिनी मांढरे व त्यांच्या सहकारी सौ. अभया उपाध्ये तसेच सर्व शिक्षकांनी केले. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शन पाहिले.
किल्ले बनविणे स्पर्धा
परीक्षक व श्री. शैलेश पाटील (भूगोल विषय) व श्री. दत्तात्रय म्हात्रे (इतिहास विषय)
म ए सो ज्ञानमंदिर, कळंबोली.प्राथमिक
बालदिन
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे १४नोव्हेंबर संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो.
या बालदिनानिमित्त प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सौ. संजना बाईत व श्री. गवळे सर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले . त्यानंतर बालदिनाची माहिती सांगण्यात आली. बाल दिनानिमित्त बाल सप्ताहात विद्यार्थ्यांना पुरेपूर आनंद घेता यावा अशा स्पर्धांची निवड करण्यात आली. १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, ठसेकाम ,कोलाज काम व टाकाऊ वस्तूपासून टिकावू वस्तू अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच ५वी ते ७ वी साठी इतिहास प्रकल्प, किल्ल्यांची प्रतिकृती व इंग्रजी नाटिका यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील निवडक चित्रांचे व टाकाऊ पासून टिकावू वस्तूंचे कलादालन व इतिहास प्रकल्प, प्रतिकृती यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. सर्व पालक,विदयार्थी यांनी प्रदर्शनाला भेट दिली.


























































































































