शालेय उपक्रम २०२४ - २५
म. ए. सो. ज्ञानमंदिर,कळंबोली. विद्यालयात शुक्रवार, दिनांक 21 जून 2024 रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' प्रमुख पाहुणे पतंजली योगपीठ मध्ये कार्यरत योगशिक्षिका श्रीमती. मीना अग्रवाल मॅडम व सहाय्यक योगशिक्षिका श्रीमती. चांदणी सिंग मॅडम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला .योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगामुळे शरीर व मन स्थिर राहते. श्रीमती अग्रवाल मॅडम व त्यांच्या सहकारी यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच प्रत्येक आसनांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
म.ए.सो ज्ञानमंदिर,कळंबोली
वर्धापन दिन
म.ए.सो ज्ञानमंदिर,कळंबोली विद्यालयात सोमवार, दिनांक 1 जूलै 2024 रोजी शाळेचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यालयात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'गीतगायन स्पर्धा' आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी शाळेचे माजी पालक श्री. रामचंद्र गायकर सर हे परीक्षक म्हणून लाभले.
इ. 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पुष्पगुच्छ व भेटकार्ड तयार केले. तोरण व फुलांच्या माळा लावून शाळा सजवली.या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, प्राथमिक विभाग मा. मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत यांचे मार्गदर्शन लाभले.
शालेय वर्ग प्रतिनिधी निवडणूक
वर्ग प्रतिनिधी निवडणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म.ए.सो.ज्ञानमंदिर , कळंबोली. (माध्यमिक विभाग) विद्यालयामध्ये वर्ग प्रतिनिधी निवडणूक दिनांक 6 जुलै 2024 रोजी घेण्यात आली. त्यासाठी ची सूचना आधीच विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांमधूनच निवडणूक अधिकारी निवडण्यात आले होते. वास्तविक पाहता आपला देश लोकशाही प्रधान देश असल्याने आपल्या देशाचा कारभार प्रत्यक्ष मतदान पद्धतीने कसा चालतो हे विद्यार्थ्यांना समजावे हा उद्देश ठेवून विद्यालयाने वर्ग प्रतिनिधी निवडणूक आयोजित केली.त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व त्यांची एक बैठक घेऊन त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य समजावून सांगण्यात आले. त्यानुसार सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी अतिशय जोमाने केली. त्यासाठी सर्व वर्गांतून उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले व त्यानंतर ज्या विद्यार्थी उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे होते त्यांना ठराविक कालावधी देण्यात आला. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांमध्ये निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सहभागी करून घेण्यात आले होते. ठरलेल्या वेळेप्रमाणे व तारखेप्रमाणे निवडणूक दिनांक 06 जुलै 2024 रोजी पार पडली. दिनांक 08 जुलै २०२४ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. शेवटी सर्व विजयी उमेदवारांचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. अशाप्रकारे 'वर्ग प्रतिनिधी निवडणूक' लोकशाही पद्धतीने अतिशय उत्साहात पार पडली.
शालेय वर्ग प्रतिनिधी निवडणुक (प्राथमिक विभाग )
शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी विद्यालयात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची वर्ग प्रतिनिधी निवडणुका घेण्यात आल्या.
भारत देशामध्ये लोकशाही कशा पद्धतीने चालते, हे विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने विद्यालयात दरवर्षी वर्ग प्रतिनिधी निवडणुका घेण्यात येतात. या निवडणुक प्रक्रियेसाठी श्री. उद्धव कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आयुक्त नेमणूक करण्यात आली. दोन मतदान कक्षाचे नियोजन करण्यात आले. निवडणूक आयुक्त, निवडणूक अधिकारी, स्वयंसेवक, शिपाई यांची नेमणूक करण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी मतपत्रिका तयार करण्यात आली. अशाप्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही वर्गप्रतिनिधी निवडणूक विद्यालयाच्या मा. मुख्याध्यापिका सौ संजना बाईत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी विद्यालयात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची वर्ग प्रतिनिधी निवडणुका घेण्यात आल्या.
भारत देशामध्ये लोकशाही कशा पद्धतीने चालते, हे विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने विद्यालयात दरवर्षी वर्ग प्रतिनिधी निवडणुका घेण्यात येतात. या निवडणुक प्रक्रियेसाठी श्री. उद्धव कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आयुक्त नेमणूक करण्यात आली. दोन मतदान कक्षाचे नियोजन करण्यात आले. निवडणूक आयुक्त, निवडणूक अधिकारी, स्वयंसेवक, शिपाई यांची नेमणूक करण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी मतपत्रिका तयार करण्यात आली. अशाप्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही वर्गप्रतिनिधी निवडणूक विद्यालयाच्या मा. मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
म.ए.सो.ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी
आज मंगळवार दि. 16 जुलै 2024 रोजी म. ए. सो. ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात, हिलाच आषाढी वारी म्हणतात. या वारीचे महत्त्व व आपली संस्कृती मुलांनी जपण्यासाठी आम्ही मुलांना वारकरी पोशाखात तयार होऊन येण्यास सांगितले व शाळेतच छोटीशी दिंडी काढली.
गुरुपौर्णिमेनिमित्ताने प्रवचनाचे आयोजन
शनिवार दि. 20 जुलै 2024 रोजी 'गुरुपौर्णिमेनिमित्त' म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात इ.5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ह.भ.प.सौ. माधुरी गोसावी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रवचनातून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरू-शिष्य यांमधील नाते कसे असावे, याविषयी सांगितले.
तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध कृती करून घेतल्या.तसेच इ. 1 ली व 2 री च्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व इ.3 री व 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्तोत्र-मधुराष्टकम, पांडुरंगाष्टकम, शिवपंचाक्षर स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र पठण स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.संजना बाईत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षण सप्ताह - पहिला दिवस
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे आलेल्या पत्रानुसार आपल्या म ए सो ज्ञानमंदिर, विद्यालयात विभागामध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये पहिल्या दिवशी इयत्ता १ली ते २ री या स्तरासाठी ठसेकाम तसेच साहित्य पेटी च्या माध्यमातून शब्द साखळी तयार करणे व इयत्ता ३री व ४ थी मुखवटे, भाज्या व फळे कार्ड्स बनविण्यात आले.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयात प्राथमिक विभाग (इयत्ता १ली ते ४थी ) लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त इंग्रजी *Story telling स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम हावभावासह गोष्टी सादर केल्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. उद्धव कदम यांनी काम पाहिले.
शैक्षणिक चित्रपट
शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मध्ये शासनाच्या आदेशानुसार म.ए सो ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात एक सामान्य कुटुंबातील मुलगा ज्याला शिक्षकांनी शिकविलेले अजिबातच कळत नाही. अशा मुलाला शिक्षक कसे नवीन पद्धत अवलंबून शिकवितात व तोच विद्यार्थी पुढे शिकून मोठा अधिकारी होतो. हे जिंकी रे जिंकी या शैक्षणिक चित्रपत्रांतून शुक्रवार दिनांक 02/08/2024 रोजी दाखविण्यात आले.
अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत टीमवर्क कार्यशाळा
शनिवार दिनांक 03/08/2024 रोजी “अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत टीमवर्क” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यालयाच्या समुपदेशक श्रीमती पूजा राजेश दोंदे यांनी कार्यशाळेची सुरुवात Human knot हा कृतीयुक्त खेळ घेऊन केली. या खेळातून टीमवर्क म्हणजे काय? टीम वर्क कसे करावे? हे शिकवण्यात आले. टीमवर्क चे फायदे सांगितले. तसेच यशस्वीरित्या टीमवर्क करण्यासाठी आपल्या अंगी कोण कोणती कौशल्य असली पाहिजेत हे समजावून सांगण्यात आले.
जीवन मे कुछ करना है तो मन को मारे मत बैठो!
आगे आगे बढना है तो हिम्मत हारे मत बैठो!
या प्रेरणादायी गीताने कार्यशाळेची सांगता झाली. या कार्यशाळेस पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियांका फडके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. धनंजय मेळकुंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
"हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा"
"हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा" अभियानाअंतर्गत शुक्रवार दि. 9-08-2024 रोजी म.ए.सो.ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. यावेळी भारतमाता, तसेच विविध क्रांतिकारक व नेते यांची वेशभूषा विद्यार्थी करून आले होते.
यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. संजना बाईत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
'तिरंगा रॅली'
"हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा" अभियानाअंतर्गत शनिवार दि. 10-08-2024 रोजी म.ए.सो.ज्ञानमंदिर, कळंबोली विद्यालयात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची सायकल वरून 'तिरंगा रॅली' काढण्यात आली. यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. संजना बाईत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षक दिन
गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यालयामध्ये *शिक्षकदिन*अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पालक शिक्षकांनी शाळेच्या अर्ध्या वेळेत शिक्षकांची भूमिका बजावली व मधल्या सुट्टीच्या वेळेनंतर इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून शिकविण्याचा आनंद घेतला. तसेच आलेल्या पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व चहा देण्यात आला.
म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धा'
गट क्रमांक १ - इ. ५ वी ते ७ वी
द्वितीय क्रमांक - कु. यशिका जगन्नाथ गोफणे (इ. ६ वी वर्षा)
तृतीय क्रमांक - कु. कृतिका संदिप सावंत (इ. ६ वी वर्षा)
शारदीय नवरात्रोत्सव
शारदीय नवरात्रौत्सवात आपल्या विद्यालयात घटस्थापना करून नियोजनाप्रमाणे प्रत्येक वर्गाची आरती व प्रसाद ठेवला जातो. शाळेतील सर्व मुलांना प्रसादाचे वाटप केले जाते. तिसरी व चौथीच्या मुलींचा भोंडला घेण्यात आला. तसेच शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सरस्वती पूजन करून*संस्कृतीची व मूल्यांची* जाणीव मुलांना करून देण्यात आली.
बालदिन सप्ताह
गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पासून बालदिना निमित्त विद्यालयात बालदिन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. प्रतिमा पूजन करून व दिनविशेषपर महत्व सांगून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून भेटवस्तू व गुलाबाचे फूल देण्यात आले.
आज इयत्ता 1 ली ते 4 थी ची स्मरणशक्ती स्पर्धा घेण्यात आली. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर 2024 रोजी हस्ताक्षर स्पर्धा व सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृतीसाठी जाहिरात सादरीकरण स्पर्धा घेणार येणार आहे.
संस्था वर्धापन दिन
दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात संस्था वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. यावेळी विद्यालयाच्या संगीत शिक्षकांनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी म. ए. सो. गीत सादर केले. दिनविशेषपर महत्त्व सांगून व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला श्री. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन यावेळी करण्यात आले.परिपाठाच्या वेळी संविधानाची प्रस्तावना व संविधानावर आधारित घोषवाक्य यावेळी विद्यार्थ्यांकडून बोलून घेण्यात आली.
क्षेत्रभेट - अलिबाग -कनकेश्वर मंदिर, कुलाबा किल्ला
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा
शैक्षणिक वर्ष 2024-05
निकाल 100 %
ग्रेड | विद्यार्थी संख्या |
A | 04 |
B | 02 |
C | 14 |
वक्तृत्व स्पर्धा
सोमवार दि.20/01/2025 रोजी विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'वक्तृत्व स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते.परीक्षक म्हणून ज्ञानमंदिर,कळंबोली या विद्यालयाची माजी विद्यार्थीनी डॉ. विद्या बापूराव दोरगे (BAMS) यांना बोलावण्यात आले होते. मा. पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल सौ.संगिता भाळे मॅडम यांनी करून दिला. विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका सौ.संजना बाईत मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.या स्पर्धेमध्ये इ.5 वी ते 7 वी च्या एकूण 20 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.या स्पर्धेनंतर विद्यालयात पार पडलेल्या गीतगायन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मा. पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
अशाप्रकारे मा. मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
शुभेच्छा समारंभ
दि. 04 फेब्रुवारी रोजी म.ए.सो.ज्ञानमंदिर , कळंबोली विद्यालयात एस.एस.सी. फेब्रुवारी 2005 ला परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी डॉ. श्री. नितीन पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
मा. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा पांडव मॅडम , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत मॅडम व माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. दिपाली कुलकर्णी मॅडम तसेच पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मा. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना जीवनात प्रगती करत असताना मोबाईलचा योग्य काळजीपूर्वक वापर कसा करावा हे समजावून सांगितले. या प्रसंगी श्रीम.थोरात मॅडम यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. म्हात्रे सर यांनी केले. अशाप्रकारे शुभेच्छा समारंभ अतिशय चांगला वातावरणात संपन्न झाला.