शाळेबद्दल

MES-Dnyan-Mandir-Kalamboli-Building

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे संगोपन करतांना समाजातील सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना ‘सन १८६० मध्ये झाली. भारतातील जबाबदार देशभक्तीपर नागरिक बनविण्यासाठी सातत्याने १५९ वर्ष कार्यरत असणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था. या संस्थेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ७७ शाखांमध्येच कळंबोली येथील म.ए.सो. ज्ञानमंदिर या शाळेचा समावेश होतो.

दि. १ जुलै १९९७ रोजी शाळेची स्थापना झाली. म.ए.सो. चे त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल ढेकणे, श्री. पानसे सर, श्री. शुक्ल सर यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका म्हणून सौ. माधवी मतलापूरकर यांनी सूत्रे हातात घेतली. म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेची स्थापना करून नवी मुंबई परिसरात म.ए.सो. ने मुहूर्तमेढ रोवली. २२ वर्षापूर्वी रोवलेल्या बीजाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. कळंबोली परिसरात मुल्याधिष्टीत उपक्रम राबविणारी शाळा असा नावलौकीक अल्पावधीतच शाळेने मिळविला.

शाळेची वैशिष्ट्ये

  • संस्कार, मूल्यशिक्षणावर आधारित उपक्रम
  • खेळासाठी भव्य मैदान
  • अद्ययावत संगणक कक्ष
  • सुसज्ज ग्रंथालय
  • स्वतंत्र सुसज्ज प्रयोगशाळा
  • इ. 10 वी च्या निकालाचा चढता आलेख
  • राज्यस्तरावर खेळात सहभाग
  • अनुभवी, कुशल, प्रयोगशील शिक्षक
  • सक्रिय पालक – शिक्षक संघ
  • NTS ,MTS, NMMS, स्कॉलरशीप , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा, सामान्यज्ञान परीक्षा , इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा इ . बाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग
  • एलिमेंटरी , इंटरमिजिएट परीक्षांची सुविधा
  • पालकांसाठी , शिक्षकांसाठी , विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याखाने
  • दृक – श्राव्य माध्यमांचा शिक्षणासाठी वापर
  • संगीत विशारद परीक्षेची सुविधा
  • सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन
  • सर्वांगिण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
  • बालवाडी ते 10 वी सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाची सोय
  • इ. ८ वी ते १० वी. साठी संस्कृत
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निबंध , गायन , नाट्य , संगीत इ. उपक्रमांचे आयोजन
  • आर. एस. पी. पथक
  • विद्यार्थ्यांना संगणकीय निकालपत्रके
  • संगणकीय कार्यालयीन कामकाज
  • ई – लर्निंग सुविधा
  • आंतरशालेय स्पर्धा, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी
  • विविध सामाजिक , शैक्षणिक , औद्योगिक क्षेत्रातील विशेष व्यक्ती भेट व स्नेह मेळावा.