म. ए. सो. ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयात. आंतरराष्ट्रीय योग दिन प्रमुख पाहुणे संस्थेचे बांधकाम विभाग विकास अधिकारी श्री. प्रवीण उबाळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला,' याप्रसंगी क्रीडाशिक्षक श्री राजाराम खताळ यांनी विद्यार्थ्यांकडून त्रिकोणासन, वज्रासन, हस्यासान, धनुष्यासन ,हलासन, भुजंगासन ,प्राणायाम अशा प्रकारे योगासने करून घेतली, यावेळी मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक या योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते, धावपळीच्या आयुष्यामध्ये शारीरिक व्याधींनी सर्व त्रस्त आहेत, अशावेळी योग केल्याने निरोगी राहता येते.मनस्वास्थ्य चांगले राहते. भारताने सर्व जगाला दिलेली योग ही देणगी आहे . करे योग रहे निरोग
व अशा शब्दात मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले, व मुलांनी दररोज योग प्रात्यक्षिके करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे हे विद्यार्थ्यांना ,समजावून देऊन योग साधनेचे महत्त्व पटवून दिले याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संजना बाईत या ही उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक दत्तात्रेय म्हात्रे यांनी केले.
हसत, खेळत , शिस्त पाळत.... ज्ञान मंदिरामध्ये क्रीडा महोत्सव साजरा...
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर प्रशालेमध्ये माध्यमिक विभागाचा तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला . डिसेंबर महिन्यातील 8 ,9 व 11 तारखेला प्रशालेचे मैदान किलबिलले होते .या तीन दिवसांच्या महोत्सवात संपूर्ण प्रशालेचे माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यासाठी शाळेच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध खेळाडू व पोलीस,त्यांनी 2006 ते 2012 महाराष्ट्र पोलीस कबड्डी टीम मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. 2011 मध्ये ऑल इंडिया रग्बी टूर्नामेंट जम्मू आणि काश्मीर मुंबई पोलीस टीम मधून प्रतिनिधित्व केले आहे. सध्या कळंबोली पोलीस मुख्यालय मध्ये कार्यरत असलेले श्री. चेतन पाटील उपस्थित होते. त्यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले .खेळाचे महत्व,फायदे प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिले व सर्वांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या .मशाल पेटवून क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली व नंतर सर्व मैदानाचे पूजन करून क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली.
क्रीडा महोत्सवाचे संपूर्ण नियोजन हे क्रीडा शिक्षक श्री .खताळ सर यांच्या देखरेखी खाली शाळेतील विद्यार्थ्यांनी केले.शाळेतील इतर शिक्षकांनी सामन्यांच्या वेळी हातात शिट्टी घेऊन पंचांचे काम केले व काहींनी गुण लेखकाचे काम केले.आपापल्या वर्गाला प्रोत्साहन देत सर्व शिक्षक प्रेक्षकाचे काम ही चोख पणे केले .
क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या वेळात सर्व मुलींच्या संघांचे खो-खो खेळ घेण्यात आले व मुलांच्या संघांचे कबड्डी खेळ घेण्यात आले. नऊ तारखेला क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण शाळेतील विद्यार्थी आपापल्या वर्गाप्रमाणे गट करून मैदानावर बसले होते. या दिवशी मुलींचे कबड्डी खेळाचे सामने व मुलांचे खो-खो खेळाचे सामने घेण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी व्हॉलीबॉल खेळाचे सामने घेण्यात आले व ज्या विद्यार्थ्यांना सांघिक खेळामध्ये सहभाग मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक खेळाचे आयोजन करण्यात आले.100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, लिंबू चमचा, गोळा फेक यांसारखे शाळेच्या मैदानावर घेण्यात आले.
अत्यंत शिस्तीत व सर्व नियमांचे पालन करत सहकार्य करत क्रीडा महोत्सवाचे तीन दिवस विद्यार्थी व शिक्षकांनी हसत, खेळत साजरे केले. महोत्सवाच्या अंतिम दिवशी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय मेळकुंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्व, फायदे पटवून दिले. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन करत हारलेल्या संघांना मनोबळ देत त्यांचे कौतुक केले व क्रीडा महोत्सवाची सांगता केली. दि . 16 डिसेंबरला क्रीडा महोत्सवाचा बक्षीस समारंभ करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या वार्षिक क्रीडा महोत्सवाची जनरल चॅम्पियनशिप नववी अ मधील कार्तिकी रमेश झोरे व नववी ब मधील पारस अरुण पाटील या विद्यार्थ्यांस मिळाली. या क्रीडा महोत्सवाला शाळा- समिती अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर महामात्र डॉ.रविकांत झिरमिटे यांचे मार्गदर्शन मिळाले.
वार्षिक स्नेहसंमेलन
म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेत शिवोत्स्व साजरा
म.ए.सो.ज्ञानमंदिर शाळेत मंगळवार दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले या वर्षीचा विषय शिवोत्सव होता.या विषयांतर्गत शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन शिशु वर्ग ते इयत्ता ९वी च्या विद्यार्थांनी आपल्या नृत्य,नाटक,गायनातून सादर केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते मा.श्री.प्रशांत देशमुख (जय शिवराय आणि गुड मॉर्निंग या सध्या गाजत असलेल्या पुस्तकांचे लेखक)होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.संजना बाईत यांनी करून दिला.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या.मुलांनी शिवाजी महाराज साकारताना नुसत्या बाह्य अंगाने न साकारता आपल्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांच्या नितीमूल्यांचे अनुकरण करावे असे सांगितले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक,माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थ्यांनी केले.आभार प्रदर्शन पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रियांका फडके यांनी केले.या कार्यक्रमास शाला समिती अध्यक्ष मा.देवदत्त भिशीकर व महामात्र मा.रविकांत झिरमिटे यांचे मार्गदर्शन लाभले.
म.ए.सो.ज्ञानमंदिर व पब्लिक स्कूल कळंबोली शाळेत युवा चेतना दिन साजरा
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’म्हणून साजरा करण्यात येतो.त्यानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारीरिक प्रात्यक्षिके सादर करतात.शुक्रवार दिनांक १२जानेवारी २०२४ रोजी म.ए.सो.च्या नवी मुंबईतील तीनही शाळांमधील विदयार्थ्यानी कळंबोलीतील ज्ञानमंदिर व पब्लिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर निसर्ग नृत्य ,स्कार्फ नृत्य ,पाँम पाँम नृत्य ,टाळ पथक ,टिपरी नृत्य,हँड ड्रील , लेझीम, असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मा.प्रमुख पाहुणे नामदेव बडरे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त )यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून ईशस्तवन व पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्यानी गायलेल्या म.ए.सो. गीतानी कार्यक्रमाची सुरुवात झाली.म.ए.सो.क्रीडावर्धीनीचे महामात्र मा.सुधीर भोसले यांनी क्रीडावर्धिनी म.ए.सो. शाळांमध्ये कोणकोणते उपक्रम राबवते ते सांगितले.प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.संजना बाईत यांनी पाहुण्यांच्या परिचय करून दिला.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विदयार्थ्यानी दररोज व्यायाम करावा.बलोपासना करावी,आपले शरीर सुदृढ ठेवावे तसेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी.संस्थेचे नाव जगभर पसरावे अशा शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात मा.बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेचा आढावा व कार्या विषयी माहिती दिली.शाळेचे महामात्र मा.रविकांत झिरमिटे सरांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमास डॉ.गोविद कुलकर्णी,डॉ.आनंद लेले,संस्थेचे कार्यकारी अधिकारी मा.सचिन आंबर्डेकर,नवी मुंबईतील शाळांचे शाखा प्रमुख ,म.ए.सो.चे हितचिंतक ,निमंत्रित ,पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ.कविता जगे यांनी केले.या कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर व शाळा समिती महामात्र रविकांत झिरमिटे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता म.ए.सो.ज्ञानमंदिर शाळेच्या विदयार्थ्यानी गायलेल्या वंदेमातरमने झाली.