शालेय उपक्रम / स्पर्धा

  • विज्ञान प्रदर्शन
  • इंग्रजी स्कीट
  • पोस्टर बनविणे
  • पालखी सोहळा
  • रक्षाबंधन साजरा करणे
  • पाढे पाठांतर
  • एकपात्री अभिनय स्पर्धा
  • स्नेहसंमेलन
  • क्रीडा स्पर्धा
  • कागदी पिशव्या बनविणे.
  • प्रवेशोत्सव
  • आंतरराष्ट्रीय योग दिन
  • वर्गप्रतिनिधी निवडणूक
  • गीत गायन स्पर्धा
  • प्रवचन / कीर्तन
  • गुरुशिष्य कथा कथन
  • वक्तृत्व स्पर्धा
  • मातीचे नाग बनवणे व विक्री
  • भोंडला शारदोत्सव
  • नाट्य स्पर्धा
  • वृक्षारोपण
  • आषाढी एकादशी – पालखी सोहळा.
  • रक्षाबंधन सामाजिक उपक्रम
  • संकल्प हंडी
  • श्लोक पाठांतर
  • कथाकथन
  • वेशभूषा
  • नाट्यीकरण
  • काव्यलेखन
  • भेटकार्ड पुष्पगुच्छ बनविणे
प्रजासत्ताक दिन
शिक्षकांचे लेझीम प्रात्यक्षिक
प्रजासत्ताक दिन :- शिक्षकांची प्रात्याक्षिके

ज्ञानवर्धिनी परीक्षा

ज्ञानवर्धिनी स्पर्धा - २०२१ -२२
ज्ञानवर्धिनी स्पर्धा - २०२१ -२२
संगीत रजनी
संगीत रजनी
संगीत रजनी
संगीत रजनी

सामाजिक भोंडला

सामाजिक भोंडला

सामाजिक भोंडला

सामाजिक भोंडला
सामाजिक भोंडला - माजी विद्यार्थिनी व शिक्षिका
सामाजिक भोंडला - म.ए.सो.ज्ञानमंदिर - शिक्षिका
सामाजिक भोंडला - गीत गायन
सामाजिक भोंडला - गीत गायन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे

ज्ञानमंदिर,कळंबोली शाळेत पर्यांवरणपूरक *किल्ले बनविणे स्पर्धा - उपक्रम

गुरुवार दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी म. ए. सो. ज्ञानमंदिर , कळंबोली

विद्यालयात पर्यावरणपूरक किल्ले बनविणे स्पर्धा -उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा उद्देश आपला इतिहास /भूगोल माहिती होणे, तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळणे मोबाईल हातात घेऊन खेळणाऱ्या मुलांना दगड ,मातीत खेळण्याचा आनंद मिळावा व लोप पावत चाललेली ही मातीचे किल्ले बनविण्याची परंपरा जागृत व्हावी.

ही स्पर्धा इ. ३री व  ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. स्पर्धेत 18 गट सहभागी झाले होते म्हणजेच 220 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांनी स्वतः किल्ले बनविण्याचा अनुभव घेतला. विशेष गोष्ट म्हणजे किल्ले बनविताना प्लास्टिक, थर्माकोलचा वापर केला नाही. किल्ले बनविताना प्रत्यक्ष त्या किल्ल्यांचा  मुलांनी अभ्यास केला होता. या स्पर्धा -उपक्रमास प्रमुख पाहुणे   व परीक्षक म्हणून श्री. गोरक्षनाथ गायकवाड -उद्योजक, तेजल केमिकल तळोजा व डॉ. श्री.बबन जाधव (PHD in History.)दादासाहेब लिमये महाविद्यालय हे लाभले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांचे कौतुक करत प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास तिन्ही मुख्याध्यापिका सौ प्रियांका फडके (पूर्व प्राथमिक),सौं. संजना बाईत(प्राथमिक), सौं. रोहिणी गायकवाड (माध्यमिक)उपस्थित होत्या. तसेच सर्व शिक्षक, पालकांचे सहकार्य लाभले. या स्पर्धा -उपक्रमास शाला समिती अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर व डॉ. श्री.गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. किल्ले बनविणे स्पर्धा

 

2 2मार्च जागतिक जलदिनानिमित्त प्रभात फेरी

2 मार्च जागतिक जलदिनानिमित्त प्रभात फेरी

बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजीच्या जागतिक जलदिना निमित्त गुरुवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागामार्फत  म. ए. सो .ज्ञानमंदीर कळंबोली.  विद्यालयाची आठवी ,नववी च्या विद्यार्थ्यांची पाणी वाचवा संदर्भात प्रभात फेरी सकाळी 8.30 ते 11.30 या वेळात काढण्यात आली. सदर प्रभात फेरी त एकूण 165 विद्यार्थी व 6 शिक्षक सहभागी होते . विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी दरम्यान पाणी वाचवा संदर्भात घोषणा दिल्या प्रभात फेरीची सांगता प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगून व ज्ञानमंदिर शाळेचे माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे आभार मानून केली.

सामाजिक भोंडला - म.ए.सो.ज्ञानमंदिर - शिक्षिका

१६१ वर्षाची परंपरा असणारी व राष्ट्रीय शिक्षण देणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही सतत उपक्रमशील नाविन्याचा ध्यास असणारी समाजाच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारी संस्था. म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली ही या संस्थेची एक शाखा या विद्यालयाने नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. सामाजिक बोंडल्याच्या निमित्ताने विद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक हितचिंतक, शाळेला सहकार्य करणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती  व संस्थापकांच्या प्रतिमा  पूजनाने व इशस्तवन गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत मॅडम यांनी केले. विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री. संतोष पाटील सर आणि विद्यार्थी यांनी विविध गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सामाजिक भोंडल्यानिमित्त कार्यक्रमास उपस्थित असलेले DDSR चे मालक श्री. राहुल हजारे व RDCC कळंबोली शाखेच्या मॅनेजर सौ. सोनल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय संस्कृतीची जोपासना करणारी शाळा अशी शाळेची प्रशंसा केली. विद्यालयाच्या चित्रकलेच्या शिक्षिका सौ.तायडे मॅडम यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक साहित्यापासून तयार केलेल्या हत्तीच्या पूजनाने भोंडला या कार्यक्रमास सुरुवात झाली. भोंडल्याची गाणी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. फडके मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. बाईत मॅडम व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम यांनी गायली. गाण्याच्या तालावर सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच स्त्री पालक प्रतिनिधी ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भोंडल्याच्या नाच गाण्यांमध्ये सहभाग घेऊन विद्यालयाचे वातावरण उल्हासित केले. विद्यालयाकडून सर्व माजी विद्यार्थी हितचिंतक या सर्वांना भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला.

या कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष श्री.  देवदत्त भिसीकर सर व महामात्र गोविंद कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गोवर्धने मॅडम यांनी केले.आभारप्रदर्शन सौ. प्रियंका फडके मॅडम यांनी मानले. अशाप्रकारे सामाजिक भोंडला व कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला

बालदिन २०२२-२३

बालदिन

बालदिन

हिंदी दिन २०२२-२३

हिंदी दिवस

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर ,कळंबोली . वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

*म ए सो ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाचे,
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
सन २०२२-२३
बुधवार २१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता म. ए .सो ज्ञानमंदिर ,कळंबोली या विद्यालयाचे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यालयाच्या प्रांगणात सर्व मान्यवर , पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव देणे हे या स्नेहसंमेलनाचे मुख्य उद्दिष्ट होते. देशप्रेम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येयनिश्चिती, निसर्ग बाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर सादरीकरण केले.
समारंभाचे अध्यक्षस्थान मा.श्री लखीचंद ठाकरे (अध्यक्ष मुख्याध्यापक संघटना) यांनी भूषवले होते तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री सचिन आंबर्डेकर ,माजी मुख्याध्यापिका मा. सौ. सविता काजरेकर व मा. श्री गोरक्षनाथ गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ गणेश स्तवनाच्या नांदीने झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. व त्यानंतर विविध गुणदर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला. या सोहळ्याचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ .रोहिणी गायकवाड यांनी केले त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात शाळेच्या उंचावणाऱ्या आलेखाबाबत विद्यार्थी ,शिक्षक व पालकांचे कौतुक केले तसेच समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
प्रास्ताविका नंतर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संजना बाईत यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. शाल ,श्रीफळ ,गुलाब रोप व ज्ञानदिवा देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री लखीचंद ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात शाळा व जिल्हा पातळीवर नावलौकिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेने असेच नावारूपाला यावे यासाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिन आंबर्डेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शाळेच्या या प्रगतीबद्दल सर्व मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर मागील तीन शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शाळाबाह्य परीक्षा, क्रीडा, चित्रकला, पर्यावरण पूरक स्पर्धा, इ. शालेय व शाळाबाह्य स्पर्धेत वर्गाची विद्यालयाची नाममुद्रा उमटणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.
कौतुक सोहळा संपन्न झाल्यावर पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियांका फडके यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच कार्यक्रमास सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
या उत्साह पूर्वक पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर उर्वरित विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रत्येक गाण्याचे निवेदन हे विद्यार्थ्यांनी केले तसेच ज्या गाण्यावर नृत्याविष्कार सादर झाले ती गाणी रेकॉर्डिंग न वाजवता विद्यालयातील गायन वादन वृंदांच्या साथीने संगीत शिक्षक श्री. संतोष पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सादर झाली .
या संपूर्ण सोहळ्यासाठी शाला समिती अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर सर व शाला समिती महामात्र श्री. डॉ. गोविंद कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता भारतगौरव गीताने झाली.

आंतरराष्ट्रीय योग दिन'

      'आंतरराष्ट्रीय योग दिन'

म.ए .सो ज्ञानमंदिर ,कळंबोली विद्यालयात शुक्रवार, दिनांक 21 जून 2024 रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' प्रमुख पाहुणे पतंजली योगपीठ मध्ये कार्यरत योगशिक्षिका श्रीमती मीना अग्रवाल मॅडम व सहाय्यक योगशिक्षिका श्रीमती चांदणी सिंग मॅडम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला .योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगामुळे शरीर व मन स्थिर राहते. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. श्रीमती अग्रवाल मॅडम व त्यांच्या सहकारी यांनी इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांकडून योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच प्रत्येक आसनांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

विज्ञान दिन

विज्ञानातील गंमती जमती

महिला दिन

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस

'आंतरराष्ट्रीय योग दिन'

'आंतरराष्ट्रीय योग दिन'

                       म.ए .सो ज्ञानमंदिर ,कळंबोली विद्यालयात शुक्रवार, दिनांक 21 जून 2024 रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' प्रमुख पाहुणे पतंजली योगपीठ मध्ये कार्यरत योगशिक्षिका श्रीमती मीना अग्रवाल मॅडम व सहाय्यक योगशिक्षिका श्रीमती चांदणी सिंग मॅडम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला . योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगामुळे शरीर व मन स्थिर राहते. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. श्रीमती अग्रवाल मॅडम व त्यांच्या सहकारी यांनी इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांकडून योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच प्रत्येक आसनांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

 

 

मराठी दिन